Pune Crime News | महागड्या चारचाकी चोरणारी आंतरराज्यीय टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 35 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | महागड्या फोर व्हीलर गाड्या चोरणाऱ्या (Steals Four Wheeler) आंतरराज्यीय टोळीला (Interstate gang) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने (Anti-Robbery and Theft Squad 2) बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीतून एक फॉर्च्यूनर कार (Fortuner car) चोरीला गेल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी गुन्ह्यात चोरीला गेलेल्या कारसह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मनोज महेंद्र परिहार (Manoj Mahendra Parihar), राजेश राधेश्याम पंडित (Rajesh Radheshyam Pandit), इस्माईल शेफरखान Ismail Shefarkhan (सर्व रा. आग्रा, दिल्ली), असे अटक (Arrest) केलेल्या आरोपींची नावे असून त्यांना शहरामध्ये वाहन चोरी करण्यास मदत करणाऱ्या गोरक्षनाथ साहेबराव साळवे Gorakshanath Sahebrao Salve (रा .काळेवाडी फाटा रहाटणी पुणे) याला अटक केली आहे. (Pune Crime News)
लोणीकंद पोलीस ठाण्यात हद्दीतून फॉर्च्यूनर गाडी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलीस अंमलदार संदीप येळे (Police Constable Sandeep Yele) आणि अमोल सरतापे (Amol Sartape) यांनी परिसरातील सीसीटीव्ही तापसले. तसेच तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) करुन आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेतले. आरोपींकडे सखोल चौकशी दरम्यान गुन्ह्यामध्ये स्थानिक सराईत गुन्हेगाराचा समावेश असल्याचे समोर आले. पोलिसांनी गोरक्षनाथ साळवे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. आरोपींनी X-PAD डिव्हाइसच्या (X-PAD Device) मदतीने बनावट चावी (Duplicate Key) तयार करुन कारची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर नोएडा येथे वाहन चोरीचे (Vehicle Theft) गुन्हे दाखल आहेत. तर त्यांना मदत करणारा पुण्यातील सराईत गुन्हेगार गोरक्षनाथ साळवे हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून लोणीकंद आणि गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपींकडून लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फॉर्च्युनर आणि गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) कार, तीन डोंगल, दीड लाख रुपये किंमतीचे इलेक्ट्रॉनिक्स चावी तयार करण्याचे पॅड, तीन मोबाईल, असा एकूण 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हे X-PAD डिव्हाईस चे साह्याने Key प्रोग्रॅम चोरून जागीच डूप्लीकेट चावी तयार करून वाहन चोरी करत होते.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे 2 सतीश गोवेकर
(ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड
(Senior PI Nandkumar Gaikwad), सहायक पोलीस निरीक्षक पाडवी (API Padvi), अंमलदार उदय काळभोर,
दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, दत्तात्रय खरपुडे, शिवाजी जाधव, सुदेश सपकाळ, गणेश लोखंडे, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे,
अमोल सरतापे, संदिप येळे, विनायक येवले यांच्या पथकाने केली.
Web Title : Pune Crime News | Inter-state gang stealing expensive four-wheelers busted by Crime Branch, goods worth Rs 35 lakh seized
Comments are closed.