पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील एका तरुणीवर वारंवार बलात्कार (Rape Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सांगोला येथील एका तरुणावर बलात्काराचा (Rape In Pune) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 21 सप्टेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 दरम्यान, नऱ्हे येथील हॉटेल, पंढरपूर, महाबळेश्वर येथे घडला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पुण्यातील चांदणी चौकात राहणाऱ्या 25 वर्षाच्या तरुणीने मंगळवारी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार चैतन्य महादेव जाधव Chaitanya Mahadev Jadhav (वय-21 रा. सांगोला) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 417, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पिडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने नऱ्हे,
पंढरपूर आणि महाबळेश्वर येथील हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले.
पीडित तरुणीने विरोध केला असताना त्याने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
तसेच तिचे अर्धनग्न फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक लाड (PSI Lad) करीत आहेत.
- Maratha Reservation | मराठा आरक्षण आंदोलन : नवले पुलावरील जाळपोळप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल
- Pune Police Inspector Transfers | लोणी काळभोर आणि विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सेवानिवृत्त, ‘या’ 2 वरिष्ठ निरीक्षकांकडे दिला अतिरिक्त कार्यभार
- Bhide Wada Smarak | भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला पुन्हा एकदा ब्रेक? रहिवासी व व्यावसायिकांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले
- Pune Crime News | स्वारगेट येथील ट्रान्सपोर्ट कंपनीला इंदौर मधील दाम्पत्याकडून 48 लाखांचा गंडा