Pune Crime News | तृतीयपंथीयांकडून कात्रज पोलीस चौकीत राडा, पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की; 10 जणांवर गुन्हा दाखल
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन 10 तृतीयपंथीयांनी (Transgender) कात्रज पोलीस चौकीत (Katraj Police Chowki) येऊन गोंधळ घातला. तसेच चौकीत कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.30 ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास कात्रज बस स्टँड जवळील कात्रज पोलीस चौकीत घडला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबबत पोलीस कॉन्स्टेबल केतन विष्णु लोखंडे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्य़ाद दिली आहे. तर रोहित पवार (वय-26), सुरज कांबळे (वय-19), अजय अहिवळे (वय-24), राणी पाटील (वय-26), मयुर राऊत (वय-24 सर्व रा. खोपडेनगर, कात्रज, पुणे), अल्फीया उर्फ लंगडी, खुशबु, आकाश आणि इतर दोन तृतीयपंथीयांवर आयपीसी 353, 332, 323, 504, 506, 143, 146, 147 सह सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम 1984 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे तृतीयपंथी असून यांचा ओळखीचा सनी याच्यासोबत बस्ती मागण्याच्या कराणावरुन भांडण झाले होते. पोलिसांनी सनी याला ताब्यात घेऊन पोलीस चौकीत आणले होते. आरोपींनी पोलीस चौकीत येऊन ‘सनी याला आमच्या ताब्यात द्या त्याचा मर्डर करणार आहोत’ असे म्हणून मोठ मोठ्याने शिवीगाळ करुन तसेच टाळ्या वाजवून गोंधळ घालून चौकीतील रजिस्टर आणि टेबलचे नुकसान केले. (Pune Crime News)
सनी याला मारण्यासाठी चौकीच्या आतील बाजूस जबरदस्तीने जात असताना फिर्य़ादी केतन लोखंडे व त्यांच्यासोबत
असलेले अधिकारी यांनी आरोपींना प्रतिकार केला. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेल्या
अधिकाऱ्यांसोबत वाद घातला. त्यांना शिवीगाळ केली. तर आरोपी सुरज कांबळे याने फिर्यादी यांच्या शासकीय
गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की करुन ढकलून दिले. राणी पाटील हिने फिर्यादी यांच्या गालावर मारुन नखाने
ओरबाडुन जखमी केले. आरोपींनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Comments are closed.