Pune Crime News | पुणे : साखरपुड्याच्या तयारीसाठी गेले अन् चोरट्यांनी घर साफ केलं

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | तक्रारदार हे त्यांच्या लहान बहिणीच्या साखरपुड्याची पूर्व तयारी करण्यासाठी फ्लॅटला कुलूप लावून गेले होते. याच संधीचा फायदा घेऊ चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने लंपास (House Burglary) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 12 फेब्रुवारी सकाळी साडेदहा ते 18 फेब्रुवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या दरम्यान, धायरी परिसरातील रायकर मळा येथील रुद्रांगण हौसिंग सोसायटीत घडली आहे. (Pune Crime News)
याबाबत विनायक रमेश लाखन (वय-25 रा. रुद्रांग हौसिंस सोसायटी, धायरी) यांनी मंगळवारी (दि.20) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अज्ञात चोरट्या विरोधात आयपीसी 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या लहान बहिणीच्या साखरपुड्याची पूर्व तयारी करण्यासाठी जनता वसाहत येथे गेले होते.
चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोयंडे व कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील बेडरुममध्ये असलेल्या लोखंडी कपाटातील लॉकरचे कुलूप उचकटून लॉकरमधील 3 लाख 55 हजार रुपये किंमतीचे 58 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. फिर्यादी 18 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घरी आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निकम करीत आहेत.
- Pune Yerawada Crime | मुलींमध्ये नाचल्याच्या कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, येरवडा परिसरातील घटना
- Pune Hadapsar Crime | पुणे : कुत्र्याच्या अंगावर पाणी टाकल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण, चार जणांवर विनयभंगाचा गुन्हा
- Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून मेफेड्रॉन जप्त, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त
Comments are closed.