Pune Yerawada Crime | मुलींमध्ये नाचल्याच्या कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, येरवडा परिसरातील घटना
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Yerawada Crime | मुलींसोबत नाचत असल्याच्या कारणावरुन तरुणाला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या वडिलांना शिवीगाळ करुन तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केले. हा प्रकार रविवारी (दि.118) रात्री नऊ ते रात्री साडे अकराच्या सुमारास येरवडा परिसरातील जेसीडी पार्क येथे घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Yerawada Crime)
याबाबत प्रतिक सिद्धार्थ कदम (वय-19 रा. लुंबिनी नगर, पुणे रेल्वे स्टेशन मागे) याने मंगळवारी (दि.20) येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली. यावरुन अक्षय शिंदे (वय-26), प्रतिक शिंदे (वय-30), अक्षय कांबळे (वय-26 सर्व रा. तिकनगर, येरवडा) यांच्यावर आयपीसी 324, 336, 323, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी नाचत असताना आरोपींनी त्याला साईडला नेले. मुलींमध्ये नाचत असल्याच्या कारणावरुन त्यांनी फिर्यादी याला शिवीगाळ करुन मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी याचे वडिल व इतर नातेवाईक आरोपीच्या घरी गेले.
त्यावेळी आरोपींनी घरात जावून लोखंडी कोयता व रॉड घेऊन फिर्यादी व त्याच्या वडिलांच्या अंगावर धावून आले.
त्यांनी वडिलांना शिवीगाळ करुन तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन जखमी केले.
तसेच उलट्या लोखंडी कोयता कपाळावर मारला. आरोपींनी तरुणाच्या वडिलांना धमकी देऊन तरुणाला दगड मारुन
पळून गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
- Pune Hadapsar Crime | पुणे : कुत्र्याच्या अंगावर पाणी टाकल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण, चार जणांवर विनयभंगाचा गुन्हा
- Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून मेफेड्रॉन जप्त, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Pune Bharti Vidyapeeth Crime | पुणे : सायबर फ्रॉडमध्ये गमावले पैसे, मौजमजा करण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचून वडिलांकडे मागितली खंडणी
Comments are closed.