Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून मेफेड्रॉन जप्त, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने देहूरोड पोलीस ठाण्याच्या (Dehu Raod Police Station) हद्दीतून मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. पोलिसांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन एकाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.19) रात्री पावणे अकराच्या सुमारास जुना पुणे-मुंबई हायवेवर असलेल्या पुना गेट हॉटेल जवळील एका कंपनी समोर करण्यात आली.(Pimpri Chinchwad Crime Branch)
याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार कपिलेश कृष्णा इगवे (वय-32) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहजाद आलम अब्बास कुरेशी (वय-38 रा. कुदळवाडी चिखली मुळ रा. चौकोनिया भारतभारी तहसील डुमरियागंज जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. तर रिजवान चाँदीवाला (रा. नालासोपारा, मुंबई) याच्यावर एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
जुना पुणे-मुंबई हावेवरील पुना गेट जवळ असलेल्या प्रोअॅक्टीव्ह टेक्निकल ऑथोपेडीक प्रा. लि. कंपनी समोर एकजण एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी थांबला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून कुरेशी याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घतेली असता 5 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 54 ग्रॅम मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आढळून आला. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने एमडी हा अंमली पदार्थ रिजवान चाँदवाला याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी एमडी ड्रग्ज व गुन्ह्यात वापरलेली एस क्रॉस चारचाकी (एमएच 14 जी.वाय 8966), रोख 78 हजार रुपये असा एकूण 16 लाख 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वाघ करीत आहेत.
- Pune Bharti Vidyapeeth Crime | पुणे : सायबर फ्रॉडमध्ये गमावले पैसे, मौजमजा करण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचून वडिलांकडे मागितली खंडणी
- Pune Hadapsar Crime | पुणे : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी ताब्यात
- Pune CP Amitesh Kumar | पुणे पोलिसांनी दिल्लीमध्ये केलेल्या छापेमारीत 970 किलो एमडी जप्त ! आतापर्यंत एकुण 3500 कोटीचं 1700 किलो एमडी जप्त, केमिकल एक्सपर्टसह 8 जणांना अटक – पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Video)
Comments are closed.