Pune Crime News | घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरात घरफोडीचे (Burglar Arrested) गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडील (Pune Police Crime Branch) युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून अटक (Pune Crime News) केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीकडून समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून 6 लाख 30 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जयवंत उर्फ जायड्या गोवर्धन गायकवाड Jaywant alias Jaydya Govardhan Gaikwad (वय-34 रा. डी.पी. रोड, आंबेडकर वसाहत, औंध, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो गेल्या महिन्यात घरफोडीच्या गुन्ह्यात जेल मधून जामीनावर (Bail) बाहेर आला होता. पोलिसांनी ही कारवाई मीनाताई ठाकरे वसाहत (Meenatai Thackeray Colony) येथील भीम दिप मित्र मंडळाजवळ केली.
पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांच्या आदेशावरुन पुणे शहरातील चोरी, घरफोडी, चैन स्नॅचींग तसेच पाहिजे/फरार, तडीपार आरोपींचा शोध गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाकडून घेतला जात होता. पेट्रोलींग करत असताना घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार जायड्या गायकवाड हा दिप मित्र मंडळाजवळ चोरीचे दागिने (Stolen Jewelry) विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार गजानन सोनुने व संजय जाधव यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 107 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry), TVS आपाची दुचाकी, दागिने वजन करण्याचे इलेक्ट्रॉनिक मशिन, घरफोडी करण्यासाठी लागणारे साहित्या असा एकूण 6 लाख 30 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपासासाठी आरोपीला समर्थ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे
(DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल तांबे (ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली
गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई (PI Nand Kumar Bidwai),
सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले (API Vaishali Bhosale), विशाल मोहिते, पोलीस अंमलदार गजानन सोनुने,
अमोल सरडे, पुष्येंद्र चव्हाण, संजय जाधव, उज्ज्वल मोकाशी, निखील जाधव, प्रमोद कोकणे, गणेश थोरात यांच्या
पथकाने केली.
Comments are closed.