Pune Crime News | खुनाच्या गुन्ह्यात फरार असणार्यांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन – खुनाच्या गुन्ह्यात फरार (Abscond in Attempt to Murder Case) असणाऱ्या सराईत गुन्हेगारांना (Notorious Criminals) गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. चौघांना पोलिसांनी पकडले (Pune Crime News) आहे. गौरव सुरेश कांबळे (वय 24, रा. गंज पेठ), फरदिन मज्जीद खान (वय 19, रा. घोरपडी पेठ), प्रथम विनोद ससाणे (वय 19, रा. कासेवाडी) व सिद्धार्थ डेव्हीड सिंग (वय 21) अशी पकडण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. pune crime branch arrest four notorious criminals
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
गौरव आणि फरदिन हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
त्यांच्यावर खडक (Khadak Police Station), दत्तवाडी (Dattawadi Police Station) व कोथरूड पोलिस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हे (FIR) दाखल आहेत.
दरम्यान, कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात हे फरार होते.
गुन्हे शाखेचे पोलीस पाहिजे आरोपी व फरार यांची माहिती काढत होते.
त्यावेळी दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकातील कर्मचारी निलेश शिवतारे व सुमित टाकपेरे यांना माहिती मिळाली की कोथरूडच्या (Kothrud) गुन्ह्यातील गौरव हा गुरुवार पेठेत साथीदारासह थांबला आहे. त्यानुसार पथकाने याठिकाणी सापळा रचून या चौघांना पकडले.
त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.
त्यांना पुढील कारवाईसाठी कोथरुड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त सुरेंद्र देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, सहाय्यक निरीक्षक जुबेर मुजावर, कर्मचारी निलेश शिवतारे, अतुल मेंगे, धनंजय ताजणे, प्रमोद मोहिते, सुमित ताकपेरे याच्या पथकाने केली आहे.
Web Title : pune crime news pune crime branch arrest four notorious criminals
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Exams Cancelled | सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब; CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्दच
कोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या ! ‘या’ रिपोर्टने वाढवली चिंता
Comments are closed.