पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पगाराचे पैसे मागितल्याच्या रागातून तीन जणांनी एका तरुणाला दगडाने मारहाण (Beating) करुन जखमी केल्याची घटना थेऊर येथे घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Pune Police) तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.8) थेऊर येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे घडला. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत मेहबुब हुसेन शेख (वय-27 रा. गणेश वाडी, थेऊर ता. हवेली) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शाहीद नागेश अक्कलकोटकर, नागेश अक्कलकोटकर, आरीफ अक्कलकोटकर यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेहबुब याने त्याच्या पगाराचे पैसे शाहीद अक्कलकोटकर याच्याकडे मागितले. याचा राग मनात धरुन नागेश याने तिथेच पडलेला दगड उचलून मेहबुब याच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तर नागेश व आरीफ यांनी फिर्यादी याला हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
- पुणे : ‘तु मोठा भाई झाला का?’ म्हणत तरुणाचे दात पाडले, चार जणांवर FIR
- तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करुन विनयभंग, दत्तवाडी परिसरातील घटना
- लोणी काळभोर : महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी, भररस्त्यात मारहाण करुन विनयभंग
- कर्जाच्या परतफेडीच्या तगाद्याला कंटाळून एकाची आत्महत्या; बँक मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल
- पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक