पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने सुरुवातीला काही रक्कम दिल्यानंतर तरुणीची साडे सहा लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार 2 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान फिर्यादी तरुणीच्या राहत्या घरी ऑनलाईन पद्धतीने घडला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन 93072XXXXXX मोबाईल धराक, टेलीग्राम धारक व वेगवेगळ्या बँक खातेदारांवर आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्याशी व्हॉट्सअॅप व टेलीग्राम अॅपच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यांना ऑनलाईन टास्क (Online Tasks) दिला. टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने सुरुवातील काही रक्कम तरुणीच्या बँक खात्यात जमा करुन विश्वास संपादन केला. यानंतर मोठ्या रक्कमेचे आमिष दाखवू फिर्यादी यांना वेळोवेळी
6 लाख 55 हजार 800 रुपये विविध बँक खात्यात पाठवण्यास सांगितले. फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून पैसे पाठवले.
त्यानंतर आरोपींनी कोणत्याही प्रकारचा परतावा तसेच घेतलेले पैसे परत न करता फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Sr PI Abhay Mahajan) करीत आहेत.
- पुणे : पगाराचे पैसे मागितल्याने तरुणाला दगडाने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल
- पुणे : ‘तु मोठा भाई झाला का?’ म्हणत तरुणाचे दात पाडले, चार जणांवर FIR
- तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करुन विनयभंग, दत्तवाडी परिसरातील घटना
- कर्जाच्या परतफेडीच्या तगाद्याला कंटाळून एकाची आत्महत्या; बँक मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल
- गणेश पेठ : पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तरुणावर वार करुन निर्घुण खून