Pune Crime News | 2 पोलिसांसह सराफाविरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा, बारामती शहरातील प्रकार

बारामती : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | महिलेची फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी बारामतीतील सहा जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये दोन पोलीस कर्मचारी (Police Personnel), सराफ आणि त्याचा मुलाचा समावेश आहे. (Pune Crime News) याबाबत महिलेने बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) फिर्याद दिली आहे.
महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शिवाजी राजाराम निकम (Shivaji Rajaram Nikam), भरत ओसवाल (Bharat Oswal), कविता शिवाजी निकम (Kavita Shivaji Nikam), जीत ओसवाल (Jeet Oswal), श्रीकांत राजाराम निकम (Srikanth Rajaram Nikam), समीर शेख (Sameer Sheikh) व दोन अज्ञात व्यक्तिंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामधील शिवाजी निकम हे वालचंदनगर पोलीस ठाण्यात (Walchandnagar Police Station) तर श्रीकांत निकम हे अकलूज पोलीस ठाण्यात (Akluj Police Station) सध्या कार्यरत आहेत.
पोलिसांनी शिवाजी निकम, भरत ओसवाल यांच्यावर बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल (Pune Crime News) केला आहे. तर इतर सर्वांविरुद्ध फसवणूक व जातीवाचक शिवीगाळ (Atrocity Act) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 80 तोळे सोने घेऊन त्या बदल्यात केवळ 20 लाख रुपये देऊन उर्वरित सोन्याचा (Gold) अपहार करुन फसवणूक केली. तसेच सोने परत देतो म्हणून शहरातील शक्ती प्लाझा खाटीक गल्ली येथे बोलावून घेत तिच्यावर बलात्कार करुन जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी केली. तर कविता शिवाजी निकम, जीत ओसवाल, श्रीकांत राजाराम निकम व समीर शेख यांनी गरुड बाग येथे बोलावून घेत जातीवाचक शिवीगाळ करुन दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (Sub Divisional Police Officer Ganesh Ingle) करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | policeman and sarafa against rape case in baramati pune rural police
- Pune Crime News | पुण्यातून अपहरण झालेल्या तरुणाची गुजरातमधून सुटका, पुणे पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक
- ACB Trap News | भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Kolhapur Crime News | उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण, माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि API राहुल राऊतला पोलीस कोठडी
Comments are closed.