मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Bakrid Holiday | राज्य शासनाने यंदाच्या वर्षात शासकीय कार्यालयांना बकरी ईद (Eid-ul-Adha 2023) या सणासाठी गुरुवार दि. २९ जून २०२३ रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे. (Bakrid Holiday)
राज्य शासनाने सन २०२३ मध्ये राज्य शासकीय कार्यालयांना एकूण २४ सार्वजनिक सुट्या अधिसूचित केल्या आहेत. सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये बकरी ईद (ईद-उल-झुआ) या सणाची सुट्टी बुधवार दि. २८ जून, २०२३ रोजी दर्शविण्यात आलेली होती. तथापि, बकरी ईद (ईद-उल-झुआ) हा सण गुरुवार, दि.२९ जून, २०२३ रोजी येत असल्याने बुधवार, दि. २८ जून, २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी आता बकरी ईद (ईद-उल- झुआ) ची सार्वजनिक सुट्टी दि.२९ जून रोजी जाहीर करण्यात आली असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. (Bakrid Holiday)
Web Title : Bakrid Holiday | Bakri Eid public holiday now on June 29
Pune Crime News | 2 पोलिसांसह सराफाविरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा, बारामती शहरातील प्रकार
ACB Trap News | भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
Ratnagiri Accident News | दापोलीत मॅक्झिमो-ट्रेलरची जोरदार धडक; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू, सातजण जखमी
Maharashtra Rain Update | राज्यात पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामानाचा अंदाज