Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून गुंडांचा तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Crime News | Out of previous enmity, gangsters tried to kill a young man by stabbing him

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तिघा गुंडांनी (Gangster) तरुणावर लोखंडी रॉडने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

याबाबत मनोज विशाल केंगार (वय २५, रा. इंदिरानगर वसाहत, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २९२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश जनार्दन साठे (Ganesh Janardhan Sathe), महेश साठे (वय २२) आणि राहुल तंबी नेसमणी Rahul Tambi Nesmani (वय २२, सर्व रा. इंदिरानगर वसाहत, खडकी) यांना अटक केली आहे. ही घटना खडकीतील इंदिरानगर वसाहतीत रेल्वेमार्गाजवळ रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज व त्यांचा भाऊ नागेश केंगार हे बोलत बसले होते.
पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन आरोपी त्यांना शिवीगाळ करु लागले. तेव्हा मनोज याने शिवीगाळ करु नका,
असे सांगितले. त्यावर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करुन तुला लय मस्ती आली आहे.
तू मला मारतोस का तुला जीवानिशी मारतो, असे बोलून लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात घातला. इतरांनी लाकडी दांडक्याने मारुन गंभीर जखमी केले. फिर्यादीचा भाऊ नागेश हा सोडविण्यासाठी मध्ये पडला असता त्यालाही तुला पण संपवून टाकतो, असे बोलून लाकडी बांबुने मारहाण करुन जखमी केले. पोलिसांनी त्यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक कदम (Assistant Police Inspector Kadam) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Out of previous enmity, gangsters tried to kill a young man by stabbing him