Pune Crime News | सराईत चोरटा कोंढवा पोलिसांकडून गजाआड, तीन गुन्हे उघडकीस
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | कोंढवा परिसरात चारचाकी आणि दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून एक चारचाकी, एक दुचाकी व दोन मोबाईल जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. कोंढवा पोलिसांनी ही कारवाई आश्रफनगर येथे केली आहे. युसूफ वजिर शेख (वय-23 रा. आश्रफनगर, कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार विकास मरगळे व सुहास मोरे यांना माहिती मिळाली की, दाखल गुन्ह्यातील आरोपी आश्रफनगर येथे त्याच्या घरच्यांना भेटण्यासाठी येणार आहे. त्यानुसार तपास पथकाने आरोपीच्या घराजवळ सापळा रचला. आरोपी घरच्यांना भेटण्यासाठी आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे दाखल गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. (Pune Crime News)
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 विक्रांत देशमुख, वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप भोसले, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, राहुल वंजारी, सुहास मोरे, जयदेव भोसले, राहुल रासगे, अभिजीत रत्नपारखी, आशिष गरुड, रोहित पाटील, राहुल थोरात, शशांक खाडे, विकास मरगळे यांच्या पथकाने केली.
Comments are closed.