Pune Crime News | कंपनीत पैसे गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची कोट्यवधीची फसवणूक, पुण्यातील प्रकार

Pune Crime News | 32 lakh fraud of two with the lure of part-time job; FIR in Vishrantwadi, Hadapsar Police Station

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | कंपनीत पैसे गुंतवल्यास त्यातून फॉरेक्स ट्रेडिंग (Forex Trading) करून गुंतवलेल्या रकमेवर दरमहा 10 ते 14 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून तिघांची 7 कोटी 32 लाखांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी येथील सिझन वर्ल्डस (Season Worlds Company), के.के. मार्केट कंपनीच्या (K.K. Market Company) मालकासह पाच जणांवर एमपीआयडी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 13 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीच्या बिबवेवाडी येथील कार्यालयात घडला. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत दिलीप गोविंद नाईक (वय-67 रा. मुकुंदनगर, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन सिझन वर्ल्डस, के.के. मार्केट कंपनीचे मालक योगेश कदम, कंपनीतील कर्मचारी तुषार मोरे, विशाल हळदणकर, दिग्वीजयसिंग, अभिषेक यांच्यावर आयपीसी 420, 406, 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (MPID Act) 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांना त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवल्यास त्यातुन
फॉरेक्स ट्रेडिंग करुन गुंतवणूक (Investment) केलेल्या रक्कमेवर दरमहा 10 ते 14 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले.
तसेच फिर्यादी यांना इंटरनॅशनल करन्सी ट्रेडिंगमध्ये (International Currency Trading) गुंतवणूक करण्यास
सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी 2 कोटी 20 लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांनी एप्रिल 2023 नंतर वेळोवेळी
परतावा देण्याची मागणी केली. मात्र आरोपींनी परतावा दिला नाही. त्यामुळे दिलीप नाईक यांनी पैशांची मागणी केली.
आरोपींनी त्यांना केवळ 2 लाख 80 हजार रुपये परत केले. (Pune Crime News)

दिलीप नाईक यांनी गुंतवलेल्या पैशावर परतावा न देता तसेच मुळ रक्कम परत न करता आरोपींनी फसवणूक केली.
एवढेच नाही तर फिर्यादी यांचे सहकारी उमेश उलवी व प्रकाश शर्मा यांच्याकडून 5 कोटी 12 लाख 10 हजार रुपये घेऊन
त्यांची देखील आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वैरागकर
(API Vairagkar) करीत आहेत.