पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | हॉटेलमधील अंडे चोरल्याच्या संशयावरून महिला कर्मचाऱ्याला कपडे उतरवण्यास भाग पाडून तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील हॉटेलमध्ये घडला आहे. येरवडा येथील हॉटेल पार्क ऑर्नेटच्या (Park Ornate Hotel Pune) शेफने हॉटेलमधील 50 वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर अंडी चोरल्याच्या कारणावरुन विनयभंग केला. हा प्रकार 26 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत घडला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत येरवडा येथे राहणाऱ्या 50 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन हॉटेल मधील शेफ (Cook) मुकेश सिंह पुन्डील Mukesh Singh Pundil (वय-31 रा. हॉटेल पार्क ऑर्नेट, येरवडा) याच्यावर आयपीसी 354, 354अ, 341, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पुन्डील हा पार्क ऑर्नेट या हॉटेल मध्ये शेफ म्हणून काम करतो. तर पीडित महिला याच हॉटेलमध्ये कामाला आहे. मुकेश पुन्डील याने महिलेला तुम्ही वेळेवर ड्युटीवर येत नसल्याचे बोलून वाईट नजरेने पाहिले. महिलेने त्याला त्यांचे ड्युटी रजिस्टर तपासण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने महिलेला अश्लील शिवीगाळ (Obscene Abuse) केली. यानंतर आरोपीने पीडित महिलेवर तू अंडे कुठे लवपवून ठेवले आहेत, असे म्हणून तिची अंग झडती घेऊन तिला कपडे उतरवण्यास भाग पाडले. तसेच महिलेचा रस्ता अडवून अश्लील शेरेबाजी करत नोकरी घालवण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) करीत आहेत.
- Pune Crime News | ‘तेरे को आज खल्लास कर देंगे’ म्हणत तरुणावर चाकूने सपासप वार, बोपोडी मधील घटना; एकाला अटक
- Uddhav Thackeray | धारावी पुर्नविकास विरोधी मोर्चात उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात, ‘अदानींची सुपारी घेणाऱ्या दलालांना…’
- Devendra Fadnavis | फडणवीसांचा थेट आरोप, ”मराठा आरक्षणाला शरद पवार-सुप्रिया सुळेंचा सर्वाधिक विरोध”
- NCP MLA Rohit Pawar | ‘तुमच्या वैयक्तिक स्वार्थापोटी लाखो युवकांना, गोर गरीबांना अडचणीत का आणता?’ MIDC वरून रोहित पवारांचा संतप्त सवाल
- MP Sanjay Raut | ‘ललित पाटील ड्रग्जप्रकरणात दोन कॅबिनेट मंत्र्यांची नावे, त्यासाठी एसआयटी नेमा’ – संजय राऊतांचे आव्हान