Pune Crime News | पुण्यात तब्बल एक कोटी रुपयांचा 520 किलो गांजा गुन्हे शाखेकडून जप्त, परराज्यातील महिलेसह तिघांना अटक

Pune Police Crime Branch Ganja Seized

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक -2 ने (Anti Narcotics Cell) मोठी कारवाई करुन आंध्रप्रदेशातून विक्रीसाठी आणलेला एक कोटी रुपयांचा 520 किलो गांजा जप्त (Ganja Seized) केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई (Pune Crime News) शनिवारी (दि.2) पुणे नगर रोडवरील अर्मसेल इंडिया कंपनीच्या (Armcell India Company) समोर करण्यात आली.

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

संदीप बालाजी सोनटक्के (वय 29 रा. मुपो. दहिवली, पाली फाटा, खोपोली, ता. खालापुर, जि. रायगड), निर्मलाकोटेश्वरी मुर्ती जुन्नुरी (वय-36 रा.चिलाकरलुपेठ, जि.गंटुर, राज्य आंध्रप्रदेश-Andhra Pradesh), महेश तुळशीराम परीट (वय-29 रा. तुपगाव पोस्ट चौक, ता. खालापूर, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) एन.डी.पी.एस अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार योगेश मांढरे (Yogesh Mandhare) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना माहिती मिळाळी की, एका पांढऱ्या रंगाची सेलेरिओ कार Celerio car (एमएच 46 बीव्ही 4560) आणि स्कॉर्पिओ Scorpio (एमएच 48 झेड 8881) या वाहनांना महाराष्ट्र शासनाची (Government of Maharashtra) पाटी लावुन आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात गांजा (Marijuana) विक्रिसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पुणे नगर रोडवरील (Pune Nagar Road) अर्मसेल इंडिया कंपनीसमोर स्कॉर्पिओ गाडी आडवली. या गाडीवर लोकसेवक नसताना आरोपींनी लोकसेवक असल्याचे भासवण्यासाठी गाडीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली होती. पोलिसांनी गाडीतील संदीप सोनटक्के व महिलेला ताब्यात घेतले.

तर सेलेरिओ गाडीमधील महेश परीट याला ताब्यात घेऊन गाड्यांची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी तिघांकडून 1 कोटी 19 लाख 82 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला. यामध्ये 1 कोटी 4 लाख 11 हजार रुपये किंमतीचा 520 किलो 550 ग्रॅम वजनाचा गांजा, 9 लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ, 6 लाख रुपये किमतीची सेलीरीओ कार, 71 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल व 200 रुपयांचा बोर्ड असा ऐवज जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे 2 सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे (PI Sunil Thopte), पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके (PSI Shubhangi Narake), पोलीस अमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, संतोष देशपांडे, युवराज कांबळे, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, मनोज साळुंके, विशाल दळवी, विशाल शिंदे, सचिन माळवे, दिनेश बास्टेवाड, सिंहगड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अविनाश कोंडे, तांत्रिक विश्लेषण चे रुषिकेश महाल्ले, सलिम तांबोळी, किरण बरडे यांच्या पथकाने केली आहे.