पुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News । मराठी सृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते (Art director Raju Sapte) यांनी पुण्यातील राहत्या घरी आत्महत्या (Suicide) केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दिग्दर्शक राजू सापते (Art director Raju Sapte) यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये सापते यांनी काम करत असताना एका युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी त्रास दिला असल्याचे सांगितलं. तर त्यांनी आत्महत्या (Suicide) करण्यामागचं कारण देखील त्या व्हिडिओमधून सांगितलं आहे. Pune Crime News | art director raju sapte committed suicide at pune due to mental harassment
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
राजू सापते यांनी त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं आहे की, ‘मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. राकेश मौर्या जे लेबर युनियनमधून आहेत, ते मला खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट तिथे थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलरली दिलेलं आहे. माझी कुठलीही कम्प्लेंट तिथे नाही. राकेश मौर्या युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की राजू सापतेने पैसे दिले नाही. असं त्या व्हिडिओत म्हटलं आहे.
पुण्यात कला दिग्दर्शक राजू सापतेंची आत्महत्या; व्हिडीओ पोस्ट करत केले पदाधिकार्यावर गंभीर आरोप (Viral Video)#DirectorRajuSapte #RajuSapte #Suicide #RajuSapteSuicide #Pune pic.twitter.com/MhlhXnRNJx
— Policenama (@Policenama1) July 3, 2021
तसेच, ‘नरेश मेस्त्री (Naresh Mestri) नामक व्यक्तीने फोन करून विचारले असता त्यांनीही सांगितले की माझे पेमेंट पूर्ण आहे. नरेश मेस्सी (Naresh Mestri) यांनी मी कोणतेही पेमेंट आत्तापर्यंत बाकी ठेवलेले नाही असे राकेश यांना सांगितले. तरी देखील ते मला त्रास देत आहते. सध्या माझ्याकडे पाच प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम मला तत्काळ सुरु करायचे आहे. त्यातील एक प्रोजेक्ट मला त्यांच्यामुळे सोडावे लागले. कारण मला ते कामच करू देत नाही. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या (Suicide) करत आहे. तरी मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. असं सविस्तर कारण सापते (Art director Raju Sapte) यांनी आत्महत्यापूर्वी व्हिडिओमध्ये संगितलं आहे.
Web Titel : pune crime news art director raju sapte committed suicide at pune due to mental harassment
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Bandatatya Karadkar News | बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Supreme Court | विधानपरिषदेच्या निवडीचे आदेश राज्यपालांना देणार नाही – सुप्रीम कोर्ट
Mahavitaran News | वीज ग्राहकांना दिलासा ! शासकीय वीज कंपन्यांना कर आकारणीतुन वगळले