पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | सफाई कामगार महिलेचा विनयभंग (Molestation Case) केल्याप्रकरणी पेरणे फाटा येथील एका दुकानदारावर लोणीकंद पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पेरणे फाटा येथील एका शॉपमध्ये 27 ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास घडला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पेरणे फाटा येथे राहणाऱ्या 35 वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) बुधवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शॉपचा मालक साहेबराव राठोड (महाराज) वय- 50 रा. बाळाबाई तांडा, अहमदनगर) याच्यावर आयपीसी 354, 354अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोड याचे पेरणे फाटा येथे शॉप आहे. याठिकाणी फिर्यादी महिला साफसफाई करण्याचे काम करते. 27 ऑक्टोबर रोजी महिला राठोड याच्या दुकानात साफसफाई करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी राठोड याने महिलेसोबत गैरवर्तन केले. महिलेने त्याला विरोध केला असता त्याने ‘हा शॉप तुझ्या नावावर करतो’ असे म्हणत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. घाबरलेल्या महिलेने पोलिसांत धाव घेत आरोपी राठोड विरोधात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार (PSI Pawar) करीत आहेत.
- कौटुंबिक वादातून पत्नीवर अॅसिड फेकले, हडपसरमधील घटना
- पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार करुन खून, येरवड्यातील ब्रह्मा सनसिटी परिसरातील घटना
- पुण्यातील अट्टल गुन्हेगार छोट्या बलकवडे याच्यावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 53 वी स्थानबध्दतेची कारवाई
- सराईत चोरटा कोंढवा पोलिसांकडून गजाआड, तीन गुन्हे उघडकीस