पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | भुकंपग्रस्त नसताना बनावट कागदपत्रे (Fake Documents) सादर करुन भुकंपग्रस्त कोट्यातून पोलीस भरती (Police Recruitment) होऊन शासनाची फसवणूक (Cheating Case) केलेल्या पोलीस शिपायावर (Police Constable) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलीस शिपाई गोविंद मधुकर इंगळे (Police Constable Govind Madhukar Ingle) असे गुन्हा दाखल केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. सध्या त्याची नेमणूक शिवाजीनगर मुख्यालयात (Shivajinagar Police Headquarters) आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक प्रविण संपतराव अब्दागिरे (Assistant Police Inspector Pravin Sampatrao Abdagire) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७०/२३) दिली आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२१ पासून घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२१ मध्ये शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात
पोलीस शिपाई भरती घेतली होती. त्यात गोविंद इंगळे याने भुकंपग्रस्त कोट्यातून अर्ज केला होता. त्यात त्याची निवड झाली.
त्याच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यावर त्याने बनावट कागदपत्र सादर करुन भुकंपग्रस्त कोट्यातून
नोकरी मिळविल्याचे दिसून आल्यावर शासनाची फसवणूक (Government Fraud) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नाईक (Assistant Police Inspector Naik) तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | A case has been filed against a police officer in Pune for defrauding the government through forged documents
- पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर धावून जाणार्या PMP बसचालकावर गुन्हा
- पुण्यात मेफेड्रोनची तस्करी करणाऱ्या तरुणास गुन्हे शाखेकडून अटक, 7 लाखांचा मुद्देमाल जप्त
- 1 लाखाची लाच स्वीकारताना सहायक पोलीस निरीक्षक (API), सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मंजूर