पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | ब्रेड आंबट लागत असल्याने ते परत गेलेल्या मुलास बेदम मारहाण केल्याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता भवानी पेठेतील (Bhavani Peth, Pune) मास्टर केक अॅन्ड कुकीज येथे घडली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
खालीद सिद्दीक अन्सारी (53), फैजान खालीद अन्सारी (29) आणि जैद खालीद अन्सारी (24, सर्व रा. कोंढवा खु.) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात संदिप जयप्रकाश पांडे (38, रा. भवानी माता मंदिर समोर, भवानी पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 231/2022 प्रमाणे भादंवि 324,323, 352, 504, 506, 34, ज्युवेनाईल जस्टीस अॅक्ट 75 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, पांडे यांचा मुलगा हा ब्रेड आंबट लागत असल्याने ते परत करण्यासाठी गेला होता.
त्यावेळी बेकरीतील तिघांना त्याचा राग आला आणि त्यांनी त्यास मारहाण करून शिवीगाळ केली.
हाताने व बॅटने मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल फेकुन दिला.
तसेच तिघांनी फिर्यादीला मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावुन जावुन शिवीगाळ देखील केली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रणदिवे (PSI Randive) करीत आहेत.
Web Title :– Pune Crime News | A boy who went to return bread was brutally beaten, a case against three in Samarth police station
हे देखील वाचा :
High BP | आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे ‘हाय ब्लड प्रेशर’; बचावासाठी सेवन करा ही ३ फळे
Benefits of Onion | ‘या’ जबरदस्त उपायाने केसांना मिळेल नवजीवन, होतील दाट आणि लांबसडक
MNS Chief Raj Thackeray | ‘बरबटलेलं राजकारण बदलायचं असेल तर…’, राज ठाकरेंनी तरुणांना केलं ‘हे’ आवाहन