मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राजकारणात (Politics) या, आम्ही संधी द्यायला तयार आहोत. राजकारण म्हणजे फक्त निवडणुका (Elections) नाहीत. राजकारणातही अनेक अंग आहेत. तुम्ही राजकारणाच्या कोणत्याही कक्षेत योगदान देऊ शकता, असे म्हणत तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे. दरम्यान, पुण्यातील एका कार्य़क्रमात बोलताना देखील राज ठकरे यांनी तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन केले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राजकरणात या, आम्ही संधी द्यायला तयार आहोत… राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नाहीत. राजकारणातही अनेक अंग आहेत तुम्ही राजकारणाच्या कोणत्याही कक्षेत योगदान देऊ शकता !#राजठाकरे #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #मनसे #RajThackerayVision pic.twitter.com/bRfPSMc4Q6
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 30, 2022
राजकारणात यायचं म्हणजे फक्त निवडणूक लढवायची असं नाही. राजकारणाला अनेक अंग आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या क्षेत्रात आपलं योगदान देऊ शकता. आज अनेक डॉक्टर असे आहेत की ज्यांनी डॉक्टरकी सोडून अभिनयात करिअर केले. मग इतर क्षेत्रातील तरुण राजकारणात का येऊ शकत नाहीत? असा सवाल राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पुण्यातील कार्यक्रमात केला होता.
बरबटलेलं राजकारण बदलायचं असेल तर मी महाराष्ट्राला आवाहन करु इच्छितो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम
करत असाल, कोणत्याही वयोगटाचे असा राजकारणात या… मी संधी द्याययला तयार आहे, असे राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :– MNS Chief Raj Thackeray | come to politics i am ready to give a chance urged mns leader raj thackeray
हे देखील वाचा :