Pune Crime News | महिला मंडळाच्या अध्यक्षाचे अपहरण करुन 17 लाखांची मागितली खंडणी; सराईत गुंडांसह चौघांना अटक, खंडणी विरोधी पथक-2 ची कारवाई

Anti-Extortion Cell-2 action

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | रेल्वे स्थानकात (Pune Railway Station) स्टॉल मिळवून देण्याच्या नावाखाली १० लाख रुपये घेऊन ते परत न केल्याने स्वयंसेवी संस्था चालविणार्‍या महिलेसह दोघा जणींचे अपहरण (Kidnapping Case) करुन त्यांना मारहाण (Beating) करुन १७ लाख रुपयांची खंडणी (Extortion Case) मागण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी (Pune Police) दोघा सराईत गुंडांसह चौघांना अटक केली आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

बाबुलाल लक्ष्मण मोहोळ Babulal Laxman Mohol (वय ४५, रा. उत्तमनगर), अमर नंदकुमार मोहिते Amar Nand Kumar Mohite (वय ३९, रा. एरंडवणा), प्रदिप प्रभाकर नलवडे Pradip Prabhakar Nalwade (वय ३८, रा. भूगाव) आणि अक्षय मारुती फड Akshay Maruti Phad (वय २४, रा. वारजे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मोहोळ आणि मोहिते हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत (Criminals On Pune Police Records).

याबाबत वैभव भास्कर पोखारे (वय ३२, रा. किरकटवाडी) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९६/२३) दिली आहे. हा प्रकार उत्तमनगरमधील देशमुखवाडी येथे १३ सप्टेबर रोजी रात्री ७ ते १४ सप्टेबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई मिनाक्षी भास्कर पोखरे या जागृती सोशल फाऊंडेशन (Jagruti Social Foundation) च्या अध्यक्ष असून त्या स्वयंसेवी संस्था चालवितात. रेल्वे स्थानकात स्टॉल मिळवून देते, असे सांगून त्यांनी आरोपींकडून १० लाख रुपये घेतले होते. यावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. त्यातून आरोपींनी मिनाक्षी पोखरे व त्यांच्या सहकारी मनिषा पवार यांना उत्तमनगरमधील रुद्र हॉटेलजवळ (Rudra Hotel Uttamnagar) बोलावून घेतले होते. त्या तेथे आल्यावर त्यांना मारहाण करुन गाडीत घालून त्यांचे अपहरण केले. त्यांना मोहोळ याच्या घरी नेऊन तेथे डांबून ठेवून मारहाण केली.

तेथून फिर्यादी यांना फोन करुन १७ लाख रुपये आणून दे, नाही तर तुला व तुझ्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to kill) दिली. फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. खंडणी विरोधी पथकातील पोलिस नाईक शंकर संपते यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यांनी प्राप्त माहितीची खातरजमा करून याबाबत खंडणी विरोधी पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना कळविले. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell Pune (AEC Pune) त्यांचा शोध घेऊन दोघींची सुटका केली व चौघांना अटक करुन त्यांना उत्तमनगर पोलिसांच्या हवाली केले. सहायक पोलीस निरीक्षक रोकडे (API Rokade) तपास करीत आहेत.

बाबुलाल मोहोळ याच्यावर १० गुन्हे नोंद असून अमर मोहिते याच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत.
प्रदीप नलवडे याच्यावर २ गुन्हे नोंद आहेत.

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokle),
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (PI Pratap Mankar),
उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), सहायक फौजदार विजय गुरव,
पोलीस अंमलदार प्रदीप शितोळे (Pradeep Shitole), विनोद साळुंखे, सुरेंद्र जगदाळे, राहुल उत्तरकर,
शंकर संपते (Shankar Sampate), संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे,
चेतन आपटे, पवन भोसले, चेतन शिरोळकर, आशा कोळेकर यांनी केली आहे.