Pune Crime News | ‘क्रिप्टो’ करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून 1 कोटीची फसवणूक, बाणेरमधील प्रकार

Cheating Fraud Case
October 27, 2023

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक (Crypto Currency Investing) करायला सांगून एका ज्येष्ठ नागरिकाची व त्यांच्या नातेवाईकांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) करण्यात आली आहे. या प्रकरणाची चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा करण्यात आला आहे. हा प्रकार एप्रिल 2021 ते आज पर्यंत सुप्रीम अॅमॅडोअर, पॅनकार्ड क्लब रोड बाणेर येथे घडला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत संजय व्यंकटेश मोडगी (वय-58 रा. बाणेर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय पोपट थोरात Sanjay Popat Thorat (रा. तुळजाभवानी नगर, खराडी, पुणे) व त्याच्या इतर साथीदारांवर आयपीसी 409, 420 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बाणेर येथे सोनिटीक्स नावाची कंपनी सुरू केली. सोनिटीक्स कंपनीचे क्रिप्टो करन्सीमध्ये (Sonetics Company Crypto Currency) व इतर वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक केल्यास कमीत कमी कालावधीत जास्त फायदा मिळेल असे आमिष आरोपींनी दाखवले. तसेच गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर 20 टक्के परतावा देण्यचे आमिष फिर्य़ादी व त्यांच्या नातेवाकांना दाखवले. आरोपींवर विश्वास ठेवून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी 1 कोटी 9 लाख 90 हजार 422 रुपयांची गुंतवणूक आरोपींच्या कंपनीत केली. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी कोणताही परतावा फिर्य़ादी तसेच त्यांच्या नातेवाईकांना दिला आहे. पैशांची मागणी केली असता आरोपींनी टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्य़ाद यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण (PI Ankush Chintaman) करीत आहेत.