पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | खडकी रेल्वे स्टेशन (Khadki Railway Station) समोर एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खुन करण्याचा प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे.
रमजान सय्यद (वय ३५) असे खुन झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अनिल शेलार यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
खडकी रेल्वे स्टेशन समोर एक जण पडला असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नागरिकांनी कळविली. खडकी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिल्यावर एका तरुणाच्या डोक्यात तसेच उजव्या व डाव्या डोळ्यावर तसेच शरीरावर विविध ठिकाणी घातक शस्त्राने वार करुन खुन करण्यात आल्याचे आढळून आले. त्याचे नाव रमजान सय्यद (वय ३५) असल्याचे समजले.
मात्र, तो कोठे राहतो, याची माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवालानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
web title: Pune crime murder near khadki railway station.
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 246 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी