पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | बुधवार पेठेतील (Budhwar Peth) कुंटणखात्यात वेश्या व्यवसाय करणार्या महिलेसोबत असलेल्या प्रेम प्रकरणावरुन त्रास दिला जात असल्याने एका २९ वर्षाच्या तरुणाने आत्महत्या (Suicide in Pune) केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.
वाल्मिकी भगवान माने Valmiki Bhagwan Mane (रा. धायरी) व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २७ फेब्रुवारी २०२१ रोजी कात्रज (Katraj News) येथील मांगडेवाडी (Mangdewadi News) येथे घडला होता.
याप्रकरणी भोर येथे राहणार्या आत्महत्या केलेल्या तरुणाच्या लहान भावाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेला अशोक (नाव बदलले आहे) व वाल्मिकी माने हे हॉटेल व्यवसायत भागीदार होते. ते एक रेस्टॉरंट चालवत होते. अशोक याचे बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणार्या महिलेसोबत प्रेम संबंध होते. त्यावरुन वाल्मिकी व ही महिला हे अशोकला त्रास देत असत. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असे फिर्यादीत म्हटले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (senior police inspector jagannath kalaskar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी प्रकरणाचा तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | love affair with a woman from Pune! The suicide of a 29-year-old man in Bhor; Crime against a hotelier Valmiki Bhagwan Mane and a woman at Bharati University Police Station
Pune Crime | तलाठ्याला मारहाण अन् तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या चालकाला शिवीगाळ
Koregaon Bhima Commission | कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला अहवाल सादर करण्यास 6 महिन्यांची मुदतवाढ
Google वर चुकूनही सर्च करू नका ‘या’ 5 गोष्टी, अन्यथा जावे लागेल जेलमध्ये; जाणून घ्या