पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा घटनेच्या चौकशीचे काम शासनाने नेमलेल्या कलकत्ता उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील आयोग (Koregaon Bhima Commission) करत आहे. या आयोगाला ३१ डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. मात्र अद्यापही काही साक्षीदारांच्या चौकशी करणे, उलट तपासणी करणे अशी कामे अपूर्ण आहे. यासाठी आणखी कालावधी जाणार आहे.त्यामुळे आयोगाचे कामकाज पूर्ण करण्यास ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव प्र. ग. देशमुख (P.G. Deshmukh, Joint Secretary, Maharashtra Home Department) यांनी स्पष्ट केले आहे (Koregaon Bhima Commission).
चौकशी आयोगाचे वकिल आशिष सातपुते (adv ashish satpute) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला (Koregaon Bhima Commission) शासन निर्णय संदर्भाधीन क्र. १२ च्या ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली होती. ती मुदत संपत आली आहे. अजूनही काही साक्षीदारांच्या साक्षी नोंदवायच्या आहेत. तसेच उलट तपासण्या घेण्याचे काम बाकी आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या कामांसाठी वेळ लागत असल्याने आयोगाने कमीत कमी ६ महिने आणखी मुदतवाढ देण्याची अपेक्षा शासनाकडे केली होती. त्यानुसार आयोगास आणखी मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासनाने (Maharashtra Government) आयोगाला आणखी सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे.
Web Title :- Koregaon Bhima Commission | koregaon bhima commission inquiry extended another six months
Google वर चुकूनही सर्च करू नका ‘या’ 5 गोष्टी, अन्यथा जावे लागेल जेलमध्ये; जाणून घ्या
Omicron Variant | चिंतेत भर! राज्यात आणखी 20 ओमिक्रॉन रुग्णांची भर, पुण्यातील 6 रुग्णांचा समावेश