पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | दाजीने घेतलेले पैसे परत करावेत, यासाठी तरुणाचे अपहरण (Kidnapping) करुन त्याला दोघांनी मारहाण (Beating) केली. जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देऊन स्टॅम्पपेपरवर जबरदस्तीने सही घेऊन मोटारसायकल काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी प्रसाद व्यंकटरमय्या चंदा Prasad Venkataramaiah Chanda (वय ३३, रा. ज्ञानेश्वर पार्क, बी टी कवडे रोड) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २७३/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नारायण रामय्या यादव ऊर्फ कामन बोयना Narayan Ramaiah Yadav alias Kaman Boyna (वय ५०, रा. मांजरी) याला अटक (Arrest) केली असून राहुल महापुरे Rahul Mahapure (रा. जाधव वस्ती, मुंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल महापुरे हा गुरुवारी दुपारी १२ वाजता फिर्यादी यांच्या घरी गेला व
त्याने मोटारसायकल घेण्यास सांगून नारायण यादव याच्या हॉटेलवर घेऊन गेला. तेव्हा त्यांना डांबून ठेवले.
दोघा आरोपींनी फिर्यादीचे दाजीने घेतलेले पैसे देऊन टाक, नाही तर तुला जीवे ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली.
चायनिजच्या मोठ्या चमच्याने व लाथाबुक्क्याने मारहाण करुन जखमी केले.
त्यानंतर फिर्यादी यांची मोटारसायकल व मोबाईल काढून घेऊन त्यांना मांजरीमधील झेड कॉर्नर येथे नेले.
तेथे जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने गाडी ट्रान्सफर फॉर्मवर सही घेतली.
पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गाडे (Sub-Inspector of Police Gade) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | kidnaps and beats a young man to return the money he took; Forcefully signed the stamp paper and took the motorcycle away
हे देखील वाचा :
Robbie Coltrane Passed Away | ‘हॅरी पॉटर’ मधील हॅग्रिडची भूमिका साकारणारे रॉबी कोलट्रेन यांचे निधन