मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – शिंदे गटाने (Shinde Group) आपला मोर्चा शिवसेनेकडून (Shivsena) आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) वळवला की काय, अशी चर्चा मागील दोन दिवसांपासून सुरू आहे. कारण कालच राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता राष्ट्रवादीतून शिंदे गटात इन्कमिंग वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) आणि शिंदे गटातील मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांची बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीवर राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) मालेगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काल अवधूत तटकरे (Avadhut Tatkare) यांनी शिवसेनेतून भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला.
अवधुत तटकरे हे सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत.
माजी आमदार अवधूत तटकरे तसेच मीरा भाईंदरच्या तीन नगरसेवकांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
बावनकुळे यांनी यावेळी, कोकणात ठाकरेंना लवकरच आणखी धक्के बसतील, असा दावा केला होता.
दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
या भेटीवर राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, राजकीय जीवनामध्ये नेत्यांच्या भेटीगाठी घ्याव्या लागत असतात,
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली असेल.
दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असं कळलंय. पण, या भेटीबाबत गैर अर्थ काढून बोलू नका.
सध्या महाराष्ट्रात अवघड परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी संकटात आहे,
वाढत्या महागाईने जनता तर बेरोजगारीमुळे तरुण पिढी त्रस्त आहे, असे पवार म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Ajit Pawar | ncp mp sunil tatkars closed door discussion with shindes ministers uday samant ajit pawar speaks candidly
हे देखील वाचा :
Pune Crime | दांडेकर पुल परिसरात दोन टोळक्यात राडा; 16 जण ताब्यात