पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | मित्राची वाट पाहत थांबलेल्या शाळकरी मुलावर सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कोथरूड येथील भेलकेनगर चौकात बुधवारी रात्री (Pune Crime) आठ वाजता घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत शिवणे येथे राहणाऱ्या 16 वर्षीय शालेय विद्यार्थ्याने कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय उर्फ सोनू बबन म्हस्के (वय 28, रा. भेलकेनगर, बेरके चाळ, कोथरूड) आणि इतर दोन जणांवर आयपीसी 307, 324, 504, 506, 34, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act), आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act) सह ज्युवेनाईल जस्टीस अॅक्ट (Juvenile Justice Act) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला करून आरोपी म्हस्के याला अटक केली आहे. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. (Pune Crime )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी हा कोथरूड परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. रात्री तो शिकवणीवरून घरी निघाला होता. त्यावेळी त्याच्या दुचाकीमधील पेट्रोल संपल्याने तो भेलकेनगर चौकात थांबला होता. त्याने मदतीसाठी मित्राला बोलावून घेतले. दरम्यान, आरोपी विजय तिथे आला. तू इथे थांबायचे नाही, मी कोण आहे माहीत आहे का? अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. आरोपी दारू पिला असल्याने फिर्यादी याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
त्यानंतर आरोपीने इतर दोन साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. त्यांनी फिर्यादी यांना तू याला का मारले अशी विचारणा करून हातातील लोखंडी रॉडने मुलाच्या डोक्यात व तोंडावर मारून जखमी केले.
त्यावेळी फिर्यादी याचा मित्र त्या ठिकाणी आला.
त्याने भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली असता त्यालादेखील मारहाण केली.
तसेच हातातील रॉड लोकांच्या दिशेने उगारून तुम्ही मध्ये आला तर असेच हाल करीन अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील (PSI Tanaji Patil) करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | incident of attack on a school boy by a goon in kothrud area
हे देखील वाचा :
Ishan Kishan Double Century | इशान किशनचं ‘शान’दार द्विशतक; बांगलादेशच्या गोलंदाजांचा घेतला समाचार
Vicky Donor 2 | ‘विकी डोनर 2’बद्दल आयुष्मान खुरानाने केला मोठा खुलासा, म्हणाला…