पुणे/आळंदी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime |एका अज्ञात महिलेचा खून (Murder) करून तिचा मृतदेह नदी पात्रात फेकून दिल्याची घटना आज (गुरुवार) उघडकीस आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) खेड तालुक्यातील चिंबळी येथील इंद्रायणी नदी (Indrayani river) पात्रात उघडकीस आली. महिलेचा मृतदेह हातपाय बांधून पोत्यात भरलेला आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलीस ठाण्यातील (Alandi Police Station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.12) सकाळच्या सुमारास चिंबळी (Chimbali) येथील स्मशान भूमी जवळच्या इंद्रायणी नदी पात्रात पोत्यात भरलेला, हातपाय बांधलेले, शरीर पाण्याने फुगलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला.
मृत महिलेचे अंदाजे वय 25-30 वर्षे आहे. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.
मृत महिला ही पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरातील असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी महिलेच्या खून प्रकरणी अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल केला असून ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.
Web Title : Pune Crime | In Pune a woman was killed and her body dumped in a river
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Bhusawal News | भाजप नगरसेवक राजकुमार खरातसह 5 जण 2 वर्षासाठी तडीपार, राजकीय वर्तुळात खळबळ