पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष (Former BJP Solapur District President) श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात (Deccan Gymkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुख यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराचा (Rape In Pune) आरोप केला होता. त्यानंतर देशमुख यांनी भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा (Resignation) दिला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुण्यात राहणाऱ्या पीडित महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर श्रीकांत आप्पासाहेब देशमुख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. देशमुख आणि महिलेची ओळख झाली होती. त्यावेळी मागील तीन वर्षापासून पत्नीशी मतभेद झाले आहेत. त्यामुळे पत्नीला लवकरच घटस्फोट (Divorce) देणार असल्याची बतावणी देशमुख यांनी महिलेकडे केली होती. त्यानंतर देशमुख यांनी बलात्कार केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. (Pune Crime)
श्रीकांत देशमुख यांनी महिलेला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तिच्यावर बलात्कार केला.
तसेच या बाबत कोणाकडे वाच्चता केल्यास आईला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देशमुख यांनी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास डेक्कन पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Former Solapur district president of BJP Shrikant Deshmukh booked in rape case Pune crime news
हे देखील वाचा :
Anti Corruption Bureau (ACB) Pune | 20 हजाराची लाच मागणाऱ्या कोतवालावर पुणे एसीबीकडून FIR
Congress On GST | मोदीजी, किमान जनतेच्या श्वासावर तरी GST लावू नका – मोहन जोशी