Pune Crime | हॉटेलमधील भांडणात मांजरीच्या माजी सरपंचावर गोळीबार ! डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Crime | firing on former sarpanch incident in manjri area of hadapsar pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | हॉटेलमध्ये एकाच टेबलावर बसलेल्याचे दुसर्‍याशी भांडणे झाले असताना त्याने साथीदारांना बोलावून मांजरीच्या (Manjri) माजी सरपंचावर गोळीबार (Firing On Former Sarpanch Of Manjri Pune) करुन त्यांच्या डोक्यात दगड, विटाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. गोळी चुकविल्याने सरपंच बचावले असले तरी त्यांच्या डोक्यात वार केल्याने जबर जखमी झाले आहेत. (Pune Crime)

पुरुषोत्तम ऊर्फ अण्णा धारवाडकर असे मांजरीच्या सरपंचाचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी नंदू शेडगे, चंद्रकांत घुले व त्यांच्या तीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरीमधील श्रीराम हॉटेलमध्ये रात्री साडेनऊ वाजता घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम धारवाडकर हे काही जणांसह रात्री श्रीराम हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्या टेबलवर बसलेल्या संजय झुरंगे याचे चंद्रकांत घुले याच्याबरोबर भांडणे झाले. धारवाडकर यांचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. भांडणानंतर घुले याने फोन करुन साथीदारांना बोलावून घेतले. धारवाडकर जेवण करुन हॉटेलमधून बाहेर पडत असताना तिघे जण मोपेडवरुन तेथे आले. त्यांच्यातील एकाने धारवाडकर यांच्या दिशेने गोळीबार केला. ती धारवाडकर यांना लागली नाही. त्यानंतर त्यांनी तेथे पडलेल्या दगड, विटांनी धारवाडकर यांना मारहाण केली. दगड डोक्यात घातल्याने त्यात ते जबर जखमी झाले. कोणी वाचवायला आले तर त्यांचीही अशीच गत करु अशी धमकी देऊन ते पळून गेले. धारवाडकर यांना तातडीने नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्यावर ८ टाके घालण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे. हडपसर पोलीस (Hadapsar Police Station) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | firing on former sarpanch incident in manjri area of hadapsar pune

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime | पुणे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांकडून अटक

Police Inspector Transfer Pune | पुणे शहरातील 10 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; शिवाजीनगर, सहकारनगरच्या वरिष्ठ निरीक्षकांची ट्रान्सफर

Maharashtra Municipal Election 2022 | राज्यात सप्टेंबर अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे अशक्य – इलेक्शन कमिशनची माहिती