पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | भाडेतत्वावर घेतलेले तब्बल 119 लॅपटॉप परस्पर दुसऱ्या कंपनीला विकून डेक्कन जिमखाना येथील डाटा केअर कॉर्पोरेशन Data Care Corporation (DCC) या कंपनीची तब्बल 37 लाख 31 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी डेक्कन पोलिसानी (Deccan Police Station) श्री ट्रेडर्स (Shree Traders) आणि व्हिजन आयटी सोल्युशन्स (vision it solutions) या दोन कंपन्यांच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा (Cheating Case) गुन्हा दाखल केला (Pune Crime) आहे.
श्री ट्रेडर्स कंपनीचे संचालक प्रदीप जनार्दन म्हात्रे Pradeep Janardhan Mhatre (रा. चिंचवड) आणि व्हिजन आयटी सोल्युशन्सचे संचालक जयेश दिवाकर म्हात्रे Jayesh Diwakar Mhatre अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी जीवन महादेव कदम (रा. सनसिटी रोड, सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपींच्या श्री ट्रेडर्स आणि व्हिजन आयटी सोल्युशन्स या कंपन्यांनी डिसीसी कंपनीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 119 लॅपटॉप भाडेतत्वावर घेतले होते.
26 ऑगस्ट 2020 ते 3 नोव्हेंबर 2020 या कालावधीत डिसीसी कंपनीला कोणतीही माहिती न देता 70 लॅपटॉप स्वेफ्टा कॉम्प्युटर्स चिंचवड व 49 लॅपटॉप इन्फिनिटी कॉम्प्युटर्स चिंचवड या कंपन्यांना (Pune Crime) विकले.
आरोपींनी लॅपटॉपचे या काळावधीमधील 7 लाख 56 हजार रुपयांचे भाडे तसेच लॅपटॉपची किंमत 29 लाख 75 हजार 68 रुपये अशी एकूण 37 लाख 31 हजारांची फसवणूक केली.
Web Title :- Pune Crime | Data Care Corporation (DCC) ! 37 lakh fraud case against Pradip Mhatre of Shree Traders and Jayesh Mhatre of Vision IT Solutions
Sachin Waze | सचिन वाझेची उलटतपासणी; अनिल देशमुखांबद्दल वाझे जबाबात म्हणाला…
Maharashtra Government | ठाकरे सरकारचा निर्णय ! मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी
Pune Crime | …म्हणून लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकले, आरोपींची कबुली
7th Pay Commission | सरकारी कर्मचार्यांसाठी खुशखबर ! नवीन वर्षात पगारात होईल मोठी वाढ