पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | गोंधळ घालणाऱ्या भाच्याला समजावण्यास गेलेल्या मामाचे भाच्याने दगड मारुन दात पाडून डोळ्याचा चावा घेतल्याचा विचित्र प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. ही घटना पुण्यातील बिबवेवाडीतील इंदिरानगरमध्ये शुक्रवारी (दि.27) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi police station) भाचा विरोधात गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उमेश रमेश वाघमारे (वय-32 रा. जय भवानी मटन शॉप जवळ, इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महादेव बाबु शिंदे (वय-37) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी मामा-भाचे आहेत. भाचा उमेश वाघमारे हा
गल्लीत गोंधळ घालत होता. त्यामुळे नागरिक जमा झाले होते. त्यावेळी मामा महादेव हे त्याला समजावण्यास गेले. त्यावेळी उमेशने मामासोबतच वाद घातला. यातून त्यांच्यात भांडण झाले. उमेशने दगड उचलला आणि मामाच्या तोंडावर मारत दात पाडले. तर त्यांच्या उजव्या डोळ्याचा चावा (Eye bite) घेतला. यामध्ये गंभीर जखमी (Seriously injured) झालेल्या महादेव शिंदे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करीत आहेत.
Web Title : pune crime crime news today one arrest
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 247 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी