पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Corona | पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या वाढत आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात विविध तपासणी केंद्रावर 7601 संशयितांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 247 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर याचदरम्यान 249 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 95 हजार 215 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 84 हजार 016 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 06 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 01 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8917 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरात 2282 अॅक्टिव्ह रुग्ण
आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 7601 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 31 लाख 18 हजार 669 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 2282 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 207 रुग्ण गंभीर आहेत.
तर 298 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
Web Title : Pune Corona | 247 new patients of Corona in the last 24 hours in Pune city know other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | काय सांगता ! होय, पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालावर चोरट्यांचा ‘डल्ला’