पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | दरोडा (robbery) टाकून लुटमार करण्याच्या तयारी असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखा युनिट चारच्या (Crime Branch Unit 4) पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई सेनापती बापट रोडवरील (Senapati Bapat Road) समर्थ रिक्षा स्टँड जवळ मंगळवारी (दि.24) रात्री पावणे दहाच्या सुमारास केली. पोलिसांनी 4 जणांना अटक (Arrest) केली असून एकजण फरार झाला आहे.
साकिब अन्सारी (वय-23), दानिश शेख (वय-22), सलमान अलवी (वय-26), वसिम अन्सारी (वय-24 रा. नागपुर चाळ, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मोहम्मद अन्सार हा फरार झाला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस नाईक विशाल कुमार शिर्के (Vishal Kumar Shirke) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi police station) फिर्याद दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रोडवरील शैलेंद्र सोसायटी जवळ असलेल्या समर्थ रिक्षा स्टँडजवळ पाच जण दरोडा टाकून लटुमार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. तर त्यांचा एक साथिदार पळून गेला. त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे लोखंडी सुरे, तलवार, कटावनी, मोबाईल, रिक्षा असा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट चारचे सहायक पोलीस निरीक्षक क्षिरसागर करीत आहेत.
web title: Pune crime crime branch arrests gang preparing for robbery.
Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात भाडे तत्त्वावर घेतलेल्या 77 कारचा वापर दारुच्या वाहतुकीसाठी
High Court | विवाहाशिवाय जन्मलेल्या मुलाच्या पित्याचे नाव सांगण्याची नाही आवश्यकता – हायकोर्ट