पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | निगडी परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण (College Student Girl) घेत असलेल्या विद्यार्थीनीचा तिच्याच महाविद्यालयातील शिपायाने (College Peon) विनयभंग (Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी (Nigdi police) विनोद बाबासाहेब चव्हाण (Vinod Babasaheb Chavan) याच्यावर आयपीसी IPC 354, 354 (अ) (4) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली (Pune Crime) आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी 19 वर्षाच्या तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.23) दुपारी पाचच्या सुमारास आकुर्डी (Akurdi) येथील खंडोबा चौकाजवळ घडला आहे. पीडित तरुणीने मंगळवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विनोद चव्हाण (रा. बिजलीनगर, चिंचवड – Chinchwad) याला अटक केली आहे. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेते त्याच ठिकाणी आरोपी शिपाई म्हणून काम करतो. त्याने शनिवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणीला फोन केला. त्यावेळी तरुणीने आरोपीला ‘काय पाहिजे’ असे विचारले. त्यावेळी शिपायाने ‘तू तू तू’ असे म्हणून पीडित तरुणीचा विनयभंग केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ (API Dhumal) करीत आहेत.
Web Title : Pune Crime | College peon arrested for molesting college girl
हे देखील वाचा :