पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | व्यसन हे किती वाईट असते आणि ते काय करायला भाग पाडेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. मुलाने आईकडे तंबाखू (Tobacco) घेण्यासाठी पैसे मागितले. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने पोटच्या मुलाने आईच्या (Mother) डोक्यात फावडे मारून खून (Murder) केला. ही खळबळजनक (Pune Crime) घटना जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे आळी या ठिकाणी मंगळवारी (दि.15) घडली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अंजनाबाई बारकु खिल्लारी (वय-60) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अमोल बारकु खिल्लारी (वय-23) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत महिलेचे पती बारकू सखाराम खिल्लारी (वय-66) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मुलाला अटक (Arrest) केली असल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे (Narayangaon Police Station) सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे (API Prithviraj Tate) यांनी दिली. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल याला तंबाखू खाण्याचे व्यसन होते.
तो मागील काही दिवसांपासून काहीही काम करत नव्हता. मंगळवारी दुपारी दीड ते तीनच्या दरम्यान घरात
कोणी नसताना आरोपीने आईकडे तंबाखूसाठी पैशाची मागणी केली.
त्यावेळी आईने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. अमोलने घर सोडून जाईन अशी धमकी आईला दिली.
त्यावेळी आईने तुला कुठे जायचे तिकजे जा, असे म्हटल्याचा राग अमोलला आला.
त्याने घरातील फावडे आईच्या डोक्यात घातले. यामध्ये गंभीर जखमी होऊन आईचा मृत्यू झाला.
पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | brutal murder of a mother by hitting her on the head shocking incident in shiroli junnar of pune district
हे देखील वाचा :
Eknath Khadse | ‘हिंमत असेल तर पूर्ण ताकदीने लढा’ – एकनाथ खडसे
Urfi Javed | ‘जा अपना मुंह देख’, उर्फीने स्प्लिट्सव्हिलामधील स्पर्धकाला दिले चोख प्रत्युत्तर