पुणे न्यूज (Pune News) :बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime Branch Police |पादचारी महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना पुण्याच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) पथकाने सापळा रचून अटक केली. पुण्याच्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch Police) दोघांकडून 5 गुन्हे उघडकीस आले आहेत.
Crime Branch arrests two for snatching mobile phones from pedestrians
गुणवंत युवराज पाटील (वय 19, रा. मुंढवा) व स्वप्नील भागवत बंगले (वय 19, रा. मगरपट्टा) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
शहरात पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन साखळी (Chain Snatching) तसेच मोबाईल हिसकावण्याच्या (Mobile Theft) घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
रस्त्यावरची गुन्हेगारीला लगाम लागत नसल्याचे दिसत आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आली आहे.
यादरम्यान कोंढव्यातील एन.आय.बी.एम. रोडवर (kondhwa nibm road) पतीची वाट पाहत थांबलेल्या महिलेचा मोबाईल हिसका मारून नेला होता.
याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (kondhwa police station) गुन्हा (FIR) दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा (Pune Crime Branch Police) युनिट पाचचे पथक करत होते.
त्यावेळी कर्मचारी महेश वाघमारे, अजय गायकवाड, चेतन चव्हाण यांना या गुन्ह्यातील आरोपी तिघे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याना पकडण्यात आले.
त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी विविध भागात फिरून 5 गुन्हे केले आहेत.
त्यांच्याकडून 50 हजार रुपयांचे 5 मोबाईल यासह 1 लाख रुपयांचा माल ऐवज जप्त केला आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे (additional commissioner of police ashok morale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shreeniwas ghatge), सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे (assistant commissioner of police laxman borate), पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil), सहाय्यक निरीक्षक प्रसाद लोणारे, उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, रमेश साबळे, विनोद शिवले, विलास खंदारे यांच्या पथकाने केली आहे.
web title: Pune Crime Branch Police | Crime Branch arrests two for snatching mobile phones from pedestrians
Weather Alert | मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता
TET | न्यायालयाच्या निर्णयामुळं 25 हजार शिक्षकांच्या नोकर्या धोक्यात?