नाशिक न्यूज (Nashik News) : बहुजननामा ऑनलाइन – Heena Panchal Arrested | बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) फेम अभिनेत्री हीना पांचाळ (Actress Heena Panchal arrested) हीला नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अटक केली आहे. इगतपुरीतील (igatpuri) स्काय ताज व्हिला (sky taj villa) या बंगल्यात सुरु असलेल्या हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर (Rave Party) टाकलेल्या धाडीत पोलिसांनी हीनासह (Heena Panchal) 22 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात 10 पुरुष आणि 12 महिलांचा सामावेश आहे. शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक केलेल्यांत बॉलिवुडमधील दोन कोरिओग्राफर (choreographer), तमिळ (Tamil) आणि काही हिंदी चित्रपटांत (Hindi Movie) अभिनय केलेल्या अभिनेत्रींचा (Actor) समावेश असल्याची माहिती यात एका विदेशी महिलेचाही समावेश असून ही महिला इराणची असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील (police superintendent sachin patil) यांनी सांगितले.
नाशिकमधील (Nashik) इगतपुरीतील (Igatpuri) 2 खासगी बंगल्यात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ड्रग्ज, कोकेन, हुक्कासारख्या अंमली पदार्थांची (Drugs) नशा करत बॉलिवूडशी संबंधित महिलांसह 22 उच्चभ्रू व्यक्तींची पार्टी सुरु असल्याची माहिती नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील (police superintendent sachin patil) यांना मिळाली. त्यानुसार शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकत या सर्वांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी अंमली पदार्थांची नशा करत ‘रेव्ह पार्टी’च्या (Rave Party) नावाखाली धिंगाणा घालणा-या सर्वांना ताब्यात घेतले. संशयितांकडून कोकेन, हुक्का, इतर ड्रग्ज हस्तगत केले आहे. याप्रकरणी विनापरवाना अंमली पदार्थ बाळगणे, सेवन करणे आणि कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करत एकत्र येऊन गर्दी जमविल्याप्रकरणी विविध कलमान्वये संबंधितांविरुध्द इगतपुरी पोलीस ठाण्यात (igatpuri police station) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
कोण आहे हीना पांचाळ? Who is Heena Panchal
हीना पांचाळ (Heena Panchal) ही मराठी बिग बॉस (Bigg Boss Marathi) दुसऱ्या पर्वातील पहिली वाइल्ड कार्ड एंट्री (wild card entry) घेतलेली स्पर्धक होती. हिना अभिनेत्री नृत्यांगणा असून ती आयटम साँग साठी प्रसिद्ध आहे. हीनाने हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय हिंदी, मराठी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटांत तिने आयटम सॉंग केले आहे.
अंमली पदार्थांचा पुरवठा मुंबईतून?
रेव्ह पार्टीसाठी (Rave Party) इगतपुरीत (igatpuri) दाखल झालेला 22 लोकांचा हायप्रोफाईल समुहाने आपल्यासोबत अंमली पदार्थांचा मोठा साठा मुंबईतून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. हा पुरवठा कोठून आणि कोणी केला याबाबतचा तपास करण्याकरिता नाशिक ग्रामीण पोलिसांचे (Nashik Rural Police) एक स्वतंत्र पथक तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.