पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पूर्ववैमनस्यातून सराईत गुंडाने तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड व दगडाने मारुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केला. या घटनेत अब्दुल हमीद शमशुद्दीन शेख हे जबर जखमी झाले आहेत. (Pune Crime)
याप्रकरणी उत्फत अब्दुल हमीद शेख (वय ३२, रा. घोरपडे वस्ती, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ४६६/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सागर पाटोळे आणि सागर गुडेकर (दोघे रा. इंदिरानगर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर – Lonikalbhor) यांना अटक केली आहे. सागर गुडेकर हा सराईत गुंड आहे. ही घटना लोणी काळभोरमधील इंदिरानगर चौकात मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडली. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती अब्दुल शेख यांची आरोपीबरोबर भांडणे झाली होती. अब्दुल शेख हे इंदिरानगर चौकात असताना सागर गुडेकर व त्याच्या साथीदाराने लोखंडी रॉड व दगडाने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Attempt To Murder Incident in Lonikalbhor police station limits
हे देखील वाचा :
Pune Ganeshotsav 2022 | पुन्हा एकदा निनादले ‘ॐ नमस्ते गणपतये…’ चे सूर
Rule Change | आजपासून झाले ‘हे’ 5 मोठे बदल, जाणून घ्या तुमच्या खिशावर कसा वाढला भार