High Cholesterol | शरीराच्या या भागातील त्वचा कोरडी पडली आहे का? समजून जा वाढली आहे कोलेस्ट्रॉल लेव्हल

High Cholesterol | high cholesterol dry skin in this area could be a sign of high levels

बहुजननामा ऑनलाइन – हाय कोलेस्ट्रॉलची (High Cholesterol) समस्या ’सायलेंट किलर’ म्हणून ओळखली जाते. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात, एक गुड कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) आणि दुसरे बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol). गुड कोलेस्टेरॉल शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते तर बॅड कोलेस्टेरॉल खूप हानिकारक असल्याचे सिद्ध होते. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे त्या आकुंचन पावू लागतात त्यामुळे रक्तप्रवाह मोठ्या प्रमाणात कमी होतो. रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. (High cholesterol)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

खराब जीवनशैली (Bad Lifestyle), अल्कोहोलचे (Alcohol) अतिसेवन आणि चरबीयुक्त पदार्थ (Fatty Foods) यामुळे हाय कोलेस्टेरॉलच्या समस्येला सामोरे जावे लागते. हाय कोलेस्टेरॉलची लक्षणे क्वचितच दिसत असली तरी त्याची काही चिन्हे आहेत, ज्यावरून हाय कोलेस्ट्रॉलचा अंदाज लावता येतो.

 

हाय कोलेस्टेरॉलच्या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होण्यास सुरुवात होते. प्लाक हाय कोलेस्टेरॉल आणि इतर पदार्थांनी बनलेला मेणासारखा पदार्थ असतो. प्लाक जास्त प्रमाणात जमा झाल्यामुळे धमन्या अरुंद होतात त्यामुळे रक्तप्रवाह मर्यादित होतो. (High cholesterol)

 

धमन्यांमध्ये अडथळे आल्याने पायातील रक्तप्रवाह थांबतो. त्यामुळे पायांमध्ये त्याची लक्षणे दिसू लागतात. क्रिटिकल लिम्ब इस्केमिया (सीएलआय) ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये पायांमध्ये रक्ताचा प्रवाह योग्यरित्या होत नाही. यामुळे, तीव्र वेदना, अल्सर किंवा जखमा होण्याचा धोका लक्षणीय वाढतो.

 

एनएचएसच्या मते, क्रिटिकल लिम्ब इस्केमिया अत्यंत धोकादायक असतो आणि तो बरा करणे कठीण आहे. क्रिटिकल लिम्ब इस्केमिया झाल्यावर त्याची काही चिन्हे शरीरावर दिसू लागतात. सीएलआयच्या मुख्य लक्षणांपैकी एक म्हणजे पायांवरील त्वचेचा कोरडेपणा हे आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मात्र, कोलेस्टेरॉल व्यतिरिक्त, कोरडी त्वचा इतर अनेक समस्यांमुळे सुद्धा होऊ शकते. परंतु सीएलआयची कोरड्या त्वचेसह इतर अनेक चिन्हे आहेत. सीएलआयच्या इतर लक्षणांमध्ये पिवळी, गुळगुळीत किंवा चमकदार त्वचा दिसून येते.

 

नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस) नुसार, ही क्रिटिकल लिम्ब इस्केमियाची लक्षणे –

पायांमध्ये तीव्र वेदना, विश्रांतीच्या स्थितीत बसूनही वेदना.
पायाची त्वचा पिवळी, चमकदार आणि गुळगुळीत आणि कोरडी दिसते.
पायाला जखम आणि अल्सर होणे आणि बरे न होणे.
पायांचे स्नायू मांस कमी होणे.
पायाची बोटे थंड पडणे आणि सुन्न होणे, तसेच लाल किंवा काळी होणे.
पायाच्या बोटांना सूज येणे आणि दुर्गंधीयुक्त पू येणे.
पायावर ही लक्षणे दिसली तर डॉक्टरांशी संपर्क साधा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- High Cholesterol | high cholesterol dry skin in this area could be a sign of high levels

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पूर्व वैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून खूनाचा प्रयत्न; लोणी काळभोरमधील घटना

Pune Ganeshotsav 2022 | पुन्हा एकदा निनादले ‘ॐ नमस्ते गणपतये…’ चे सूर

Rule Change | आजपासून झाले ‘हे’ 5 मोठे बदल, जाणून घ्या तुमच्या खिशावर कसा वाढला भार