पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | घरी जात असलेल्या तरुणाला वाटेत अडवून त्याला पैशाची मागणी करुन तलवारीने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) अभिजित ऊर्फ चड्डीभैय्या रमेश शिंदे (Abhijit alias Chaddibhaiyya Ramesh Shinde) याला अटक (Arrest) केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी माजीद अकबर शेख Majid Akbar Sheikh (वय 21, रा. गाडीतळ, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अभिजित ऊर्फ चड्डीभैय्या रमेश शिंदे (वय 19, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याला अटक केली आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजीद शेख हे गुरुवारी पहाटे चार वाजता मंडप बांधण्याचे काम करुन त्याचे घरी जात होते.
आर. के. चौकात (R. K. Chowk) शिंदे याने त्यांना अडवून पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता शिंदे याने त्याला शिवीगाळ करुन ‘मुझे पैसे नही देता क्या, साले पैसे नही देगा, तो जान से मार डालेगा’ असे बोलून त्याच्याकडील तलवारीने (Sword) फिर्यादीच्या डोक्यात वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन पँटच्या खिशातील 3 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Attempt To Murder Case Yerwada Laxmi Nagar Area
हे देखील वाचा :
Gold Price Today | सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या चांदीचा दर
Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन