पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | किरकोळ कारणावरुन दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली (Pune Crime) आहे. ही घटना शुक्रवारी (दि.16) दुपारी साडेबाराच्या सुमारास काळेपडळ रेल्वे गेट येथे घडली आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कैलास विठ्ठल हेगडे (वय-23 रा. ओमकार कॉलनी, काळेपडळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नोमान उर्फ काळ्या शेख (रा. सय्यद नगर, हडपसर) व त्याच्या इतर दोन साथीदारांवर आयपीसी 307, 504, आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे काळेपडळ रेल्वे गेट जवळून पायी घरी जात होते.
त्यावेळी त्यांच्या दिशेने एक कुत्रा धावून आला. त्यामुळे घाबरुन त्यांनी कुत्र्याच्या दिशेने दगड मारला.
त्याचवेळी आरोपी हे दुचाकीवरुन जात होते.
आपल्याला दगड मारल्याचा गैरसमज करुन आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली.
तसेच काळ्या शेख याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात आणि डाव्या दंडावर वार केले.
यामध्ये फिर्य़ादी गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव (API Jadhav) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | A young man was stabbed with a spear for a minor reason, an incident in Hadapsar area
हे देखील वाचा :
Weight Loss | झोपण्यापूर्वी प्या हे ३ ड्रिंक्स, ‘जिम’ला न जाता होईल कॅटरिनासारखी फिगर
Radish | मुळा खाल्ल्याने या ४ प्रकारच्या लोकांना होऊ शकतो त्रास; पूर्णपणे टाळा