पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | लॉन्ड्री चालकाचा (Laundry) खून (Murder) करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह (Dead Body) नदीपात्रात फेकून दिला. हा प्रकार आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास उघडकीस आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. गणेश सुरेश कदम Ganesh Suresh Kadam (वय-35 रा. शनिवार पेठ, पुणे) असे खून झालेल्याचे (Pune Crime) नाव आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नदीपात्रात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. मृत व्यक्तीच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार करुन खून केला आहे. पोलिसांनी तरुणाची ओळख पटवली असून आरोपींचा शोध सुरु केला आहे. (Pune Crime)
पोलिसांनी केलेल्या तपासात गणेश कदम याचा लॉन्ड्री व्यवसाय असून त्याचे शनिवार पेठेत लॉन्ड्री चे दुकान आहे.
रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्याला फोन आल्याने तो घरातून बाहेर पडला होता.
मात्र, त्यानंतर तो घरी आला नाही.
आज दुपारी एका सर्व्हिस सेंटर चालकाला नदीपात्रात झेडब्रीज जवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पुढील तपास डेक्कन पोलीस करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | A laundry driver was killed and his body was thrown in a river in the Deccan area, causing great excitement
हे देखील वाचा :
Health Tips | मेंदू आणि शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी नाश्त्यात करा ‘या’ 6 विशेष पदार्थांचा समावेश
Tips to Get Rid of Mucus | सर्दीनंतर छातीत साठला असेल कफ तर ‘या’ 4 पद्धतीने मिळवा आराम
Tanaji Sawant | तानाजी सावंतांचे ते वक्तव्य दुर्दैवी, जबाबदार लोकांनी…, विखे पाटलांनी टोचले कान