पुणे न्यूज :बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | कागदपत्रावर वडिलांच्या खोट्या सह्या (False signature) करुन भावानेच भावाची एक कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) वानवडी येथील आयडीबीआय बँकेत (IDBI Bank Wanwadi) घडला आहे. याप्रकरणी एकावर वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
जयदिप विठ्ठल लडकत Jaideep Vitthal Ladkat (रा. 907/ए/1 कुमार प्रसन्न सोसायटी, सर्व्हे नं. 44, वानवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी प्रसन्न विठ्ठल लडकत Prasanna Vitthal Ladkat (वय-44 रा. 907/ए/1 कुमार प्रसन्न सोसायटी, सर्व्हे नं. 44, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे दोघे भाऊ आहेत. मार्च 2020 पासून आरोपी जयदिप याने वडिलांच्या नावाने कागदपत्रावर खोट्या सह्या केल्या. तसेच कागदपत्र खरी असल्याचे सांगून आयडीबीआय बँकेच्या वानवडी शाखेतून पैसे काढले. आरोपी जयदीप याने वडिलांच्या खोट्या सह्या करुन फिर्यादी यांची एक कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करुन जयदिप लडकत याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Pune Crime | A case has been registered against Jaideep Ladkat in a Rs 1 crore fraud case.
Pune Crime | पुण्यातील उद्योजक गायकवाड बाप-लेकास तब्बल ‘एवढया’ दिवसांची पोलिस कोठडी