पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पुणे शहर पोलिस आयुक्तलायाच्या गेटवर स्वतःला पेटवून घेऊन घेणार्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. सुरेश विठ्ठल पिंगळे (रा. खडकी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरेश पिंगळेने पोलिस आयुक्तालयाच्या गेटवरच ज्वलनशील पदार्थ अंगावरून टाकून पेटवून घेतले होते. त्यामध्ये तो गंभीररित्या भाजला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आयुक्तालयाच्या (pune police commissioner office) गेटवर पेटवून घेतल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. बंडगार्डन पोलिस ठाण्यातील (bund garden police station) वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीररित्या जखमी झाल्यामुळे पिंगळेला फरासखाना पोलिस ठाण्याच्या (faraskhana police station) हद्दीत असलेल्या सुर्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज (गुरूवार) उपचारादरम्यान पिंगळे यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title : Pune Crime | Death of a person who set fire to the gate of Pune Police Commissionerate
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | सीटी स्कॅन मशीन देण्याच्या आमिषाने डॉक्टरांना 18 लाखांना गंडा
Chandrakant Patil | भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील अपघातातून थोडक्यात बचावले