पुणे : बहुजननामा ऑनलाईन– Pune Crime | कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत असताना रस्त्याच्या कामातील डिझेल, डांबर, लोखंड, खडीमध्ये अपहार करून 9 कोटी 8 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी (Pune Crime) प्रोजेक्ट मॅनेजरवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2016 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत घडला आहे.
बृजेंद्रकुमार इंद्रदेव सिंह (वय 42, रा. एनआयबीएम रोड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रोजेक्ट मॅनेजर शाम अशोक निकम (रा. शिंगणापूर, अहमदनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिळालेल्या माहितीनुसार, शाम निकम हे फिर्यादी यांच्या रोडवेज सोल्यूशन इंडिया इन्फ्रा या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कामाला होते.
त्यावेळी खेड-सिन्नर बायपास, म्हसवड-पिलीव, पंढरपूर, कुर्डुवाडी-पंढरपूर, सातारा-रहिमतपूर अशा प्रकल्पांचे काम निकम पाहत होते.
त्या काळात डिझेल, डांबर, लोखंड, खडी, बोल्डर, पॅनल रिप्लेसमेंट असा
एकूण 9 कोटी 8 लाख 6 हजार 355 रुपयांचा अपहार करून निकम याने कंपनीची फसवणूक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोहिते करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | 9 crore embezzlement in road works a case has been filed against the project manager pune crime news
हे देखील वाचा :
Sudipto Sen | ‘द केरळ स्टोरी’च्या दिग्दर्शकाची नदाव लॅपिड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया
Pune MNS | पुण्यात मनसेला मोठा धक्का ! 400 मनसे कार्यकर्त्यांचे राजीनामे, वसंत मोरेही पक्ष सोडणार?