बहुजननामा ऑनलाईन टीम – Pakistani Actress Armeena Khan | अरमीना राणा खान ही एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आहे. सध्या ती प्रेग्नंट असून, ती हा काळ एन्जॉय करत आहे. यादरम्यान तिने सोशल मीडियावर प्रेग्नंसी शूटचे फोटो पोस्ट केले. मात्र, तिचे हे फोटो पोस्ट करणे पाकिस्तानच्या लोकांना रुचले नाही. या फोटोवरून पाकिस्तानच्या लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. लोकांच्या या कमेंट्सवर अरमीना राणा खान हिने सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. (Pakistani Actress Armeena Khan)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अरमीनाने आपल्या पतीसोबत पोज देत काही फोटो शेअर केलेत. ज्यामध्ये तिचे बेबी बंप दिसत आहे. या फोटोवरून पाकिस्तानी ट्रोलर्सनी मात्र तिला खूप सुनावले. हे फोटोशूट करणे धर्माच्या विरोधी असल्याचे ट्रोलर्स म्हणाले. एवढेच नाही तर अगदी गलिच्छ भाषेत तिच्यावर टीका केली. हॉलिवूडची कॉपी असेदेखील ट्रोलर्स तिला म्हणाले. (Armeena Khan)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ट्रोलर्सच्या या टीकेला अरमीनाने सडेतोड उत्तर देत त्यांची चांगलीच बोलती बंद केली आहे. मला या ट्रोलिंगवर खरे तर हसू येत आहे. सकाळपासून उडत आहेत. अनेक जण मला माकड बोलले म्हणून अरमीनानेही हॅशटॅग बंदर बंदरिया असे लिहिले. जेव्हा तुम्हाला रस्त्यावर चालताना एखादी प्रेग्नंट बाई दिसते तर तुम्ही काय नजर चोरता का मोठा चष्मा घालता. 21 व्या शतकातही महिलेवर अशा प्रकारची टीका होत असेल तर हे दुर्दैवी आहे, असे अभिनेत्री अरमीनाने म्हटले आहे.
Web Title :- Pakistani Actress Armeena Khan | pakistani actress slams trollers regarding her pregnancy photoshoot her reply went viral
हे देखील वाचा :
Sudipto Sen | ‘द केरळ स्टोरी’च्या दिग्दर्शकाची नदाव लॅपिड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया